खोटे आरोप, मीडिया ट्रायल, अडचणीत आणण्याचे षडयंत्र व प्रचंड मनस्ताप तरीही राखला संयम!

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे हे मागील आठ दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्रात विपश्यना घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


मागील साधारण सहा महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या भोवती विणले गेलेले खोटे आरोपांचे जाळे, मीडिया ट्रायल यांसह विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच आठ दिवसापूर्वी माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊन धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली होती.


मधल्या काळात धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर काही दिवसातच त्यांना बेल्स पालसी या दुर्मिळ आजाराने ग्रासले. विविध उपचार घेऊनही अद्याप धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत हवी तितकी सुधारणा झालेली नाही.


चारही बाजूने धनंजय मुंडे यांना खोटे आरोप, मीडिया ट्रायल करून कात्रीत पकडले असताना देखील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन धनंजय मुंडे हे या काळात अतिशय शांत होते. अत्यंत संयमी राहत त्यांनी कसलेही प्रत्युत्तर न देता ही परिस्थिती हाताळली. 


मात्र या काळात प्रचंड मनस्ताप, ट्रायल, आरोपांच्या फैरी सहन केलेल्या धनंजय मुंडे यांनी इगतपुरी येथील सुप्रसिध्द विपश्यना केंद्र येथे जाऊन मन:शांती घेण्याचा निर्णय घेतला. आठ दिवसापासून ते त्या ठिकाणी ध्यानधारणा करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून  सांगण्यात आले. 


सलग दहा दिवस त्यांचा हा कार्यक्रम असल्याचे समजते त्यापैकी आठ दिवस पूर्ण झाले असून ते आपली ध्यान साधना पूर्ण करून दोन तारखेला पुन्हा कामाला लागणार असल्याचे त्यांचे कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.


याच काळात बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार आर टी देशमुख यांचे अपघाती निधन झाले. देशमुख हेही मुंडे कुटुंबाचे अतिशय जवळचे होते. तरीही देशमुख यांच्या अंत्यसंस्कारात धनंजय मुंडे दिसून आले नाहीत.


त्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी धनंजय मुंडे कुठे आहेत याबद्दल सुगावा लागू दिला नव्हता मात्र ते नाशिक येथे इगतपुरी येथील केंद्रात विपश्यना घेत असल्याचे आता समोर आले आहे.


वेगवेगळे वाद, आरोप, शपथविधी राजीनामा अशा वेगवेगळ्या घटनांमुळे धनंजय मुंडे हे मागील सहा महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. मधल्या काळात ते उपचारासाठी विदेशात गेल्याची ही माहिती आली होती, या विपशनेनंतर नवीन धनंजय मुंडे पाहायला मिळतात का? याकडे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार