शासकीय इतमामात आर.टी.देशमुखांना अखेरचा निरोप !
मोह्याचे निर्मोही, सोज्वळ- सालस, स्नेहमयी 'जिजा' अनंतात विलीन !
हजारो स्नेही जणांनी साश्रुपूर्ण नयनांनी दिला अखेरचा निरोप!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
भारतीय जनता पक्षाचे माजलगाव मतदारसंघातील माजी आमदार व दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे निकटवर्तीय आर.टी. देशमुख यांच्या पार्थिवावर परळी वैजनाथ येथे आज दि. 28 रोजी हजारो स्नेहीजणांच्या उपस्थितीत शासकीय शिष्टाचारात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय सामाजिक व सर्व स्तरातील स्नेहीजनांच्या साश्रुपूर्ण नयनांनी लाडक्या जिजांना अखेरचा निरोप देण्यात आला.
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे निकटचे सहकारी राहिलेल्या माजलगाव चे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचे दि.26 रोजी औसा रस्त्यावर अपघाती निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराचा विधी आज (दि.२८) परळी येथील तहसील कार्यालया पाठीमागील त्यांच्या निवासस्थाना जवळील मैदानात करण्यात आला. सकाळीच दिवंगत आर.टी. देशमुख यांचे पार्थिव लातूरहून परळी येथे आल्यानंतर अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवण्यात आले होते. सकाळपासूनच अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या समर्थक, नातलग, चाहते व स्नेहीजणांनी रीघ लावली होती. अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची निवास स्थानामधून अंत्ययात्रा निघाली. टाळ- मृदंग व भजनी मंडळाच्या साथीने ही अंत्ययात्रा निघाली. शासकीय शिष्टाचारामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शासन प्रतिनिधी म्हणून राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. वैदिक मंत्रघोषात त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. त्यांची मुले राहुल, अभिजीत व रोहित यांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवाला मंत्रांग्नी देण्यात आला. यावेळी शोकाकुल वातावरणातील स्नेहीजनांना दु:खअवेग आवरता आला नाही.उपस्थित सर्वांनी आपल्या या लाडक्या नेत्याला साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.आश्रू पुसत आणि हुंदके आवरत असलेल्या वृध्द माता-भगिनी, मुश्किलीने आश्रू आवरणारे असंख्य कार्यकर्ते आणि आक्रोश करणारे देशमुख कुटुंबीय अशा शोकाकुल आणि भावपूर्ण वातावरणात माजी आमदार आर. टी. देशमुख जिजा यांच्या पार्थिवावर परळीत शासकीय शिष्टाचारात अंत्यसंस्कार करण्यात आले.
संपूर्ण मराठवाड्यातील विशेषत: बीड जिल्हा,माजलगांव, परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी रांगा लावुन आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेतले.सकाळी 10.45 वाजता अंत्ययात्रा निघुन 11 वाजता पार्थिव अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणी आले. यावेळी प्रथम शासनाच्यावतीने पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर खा. बजरंग सोनवणे, खा. ओमराजे निंबाळकर, आ. राजेश विटेकर, डाॅ. रत्नाकर गुट्टे, सौ. राजश्रीताई धनंजय मुंडे, अक्षय मुंदडा, शासनाचे प्रशासकीय प्रतिनिधी अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे,उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले.यावेळी ना. पंकजा मुंडे यांच्यासह आ. राजेश विटेकर, डाॅ. रत्नाकर गुट्टे, खा. ओमराजे निंबाळकर, खा. बजरंग सोनवणे, फुलचंद कराड यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.यावेळी माजी ग्राम विकास राज्य मंत्री पंडितराव दौंड ,माजी आमदार भीमराव धोंडे,बाजीराव जगताप, संगीता ठोंबरे, पृथ्वीराज साठे, मधुसूदन केंद्रे, मदनसिंह मोहिते पाटील,सौ. उषाताई दराडे, नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे फुलचंद कराड, ओबीसी राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. टी. पी. मुंडे, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, ॲड .विष्णुपंत सोळंके, ऑडिओ.राजेश्वर चव्हाण, शिवसेनेचे नेते शिवाजी कुलकर्णी यांच्यासह विविध पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा