खड्ड्यात गेली जनभावना-असे वागू नये!

परळीतील हा खड्डा बनतोय 'मौत का कुंवा' : किर्तीनगर रस्त्यावरील धोकादायक खड्डा; नगर परिषदेची 'अपकिर्ती'!

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       परळी नगर परिषदेच्या अत्यंत जन सुलभ कार्याची महती आहे. आपल्या सुनियोजित  नियोजनशून्य कारभरासाठीची नगर परिषदेची कीर्ती सर्वश्रुत आहे. एका बाजूला पाणीपुरवठ्याची बोंबाबोंब परळी शहरात सुरू असताना दुसऱ्या बाजूला अनेक भागांमध्ये पडलेल्या खड्ड्यांनी डोके वर काढत नागरिकांची डोकेदुखी वाढवलेली आहे. अशाच प्रकारचा एक खड्डा मौत का कुवा बनलाअसुन या खड्ड्याने जीवघेणा धोका निर्माण केला आहे. निदान या खड्ड्याची दुरुस्ती करणे आवश्यक बनले आहे.कीर्तीनगर मधील रस्त्यावर धोकादायक पडलेला हा खड्डा नगरपरिषदेला दिसत नाही का? अशी होणारी अपकीर्ती थांबवावी अशी अपेक्षा आहे.

      परळी नगर परिषदेच्या कामाचा व्याप खूप मोठा आहे. नगर परिषदेच्या अनेक विभागांना जबाबदाऱ्या दिलेल्या असल्या तरी या विभागातील सर्व संबंधितांना अन्य अति महत्वाच्या व्यापातून नागरि समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही हे सर्वांना माहीत आहे. वाण धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन असल्याने कायमच नागरिकांची पाण्याची बोंब सुरू असते. मानसूनपूर्व कामांचा मोठा गाजावाजा केलेल्या नगरपरिषद प्रशासनाने नेमके कोणते काम सुरू केले आहे? हे संशोधन करून शोधावे लागणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या भागांमध्ये नागरी वस्त्यांमधील असणाऱ्या रस्त्यांच्या अवस्था ही फारशा चांगल्या नाहीत हेही शहराचे वास्तव आहे.

      शहरातील मुख्य रस्त्यांची वाट तर केंव्हाच लागलेली आहे. चार थेंब पडले तरीही रस्त्यावर मुसळधार पाऊस आल्याचे फिलिंग येते आणि कोणत्याही रस्त्याने जा तुम्ही जलप्रवास करत असल्याचा अनुभव नगर परिषदेच्या आशिर्वादाने नागरिकांना मिळत असतो. नागरी वस्त्यांमधील असलेल्या रस्त्यांवर काही ठिकाणी ढापे पडलेले  असतात काही रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत .त्या त्या भागातील नागरिक संबंधितांच्या कानावर त्या गोष्टी कायमच घालत असतात. मात्र याकडे डोळेझाक करून नागरिकांचे जीवन रस्त्यावर त्रास सहन करायला सोडून देण्यात येते. नगरपरिषदेच्या प्रशासकाचा प्रशासनावर वचक नाही हे वारंवार सिद्ध होतेच.पण असाच काहीसा प्रकार शहरातील कीर्ती नगर भागाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाबतीतही घडला आहे. या रस्त्यावर एक भला मोठा खड्डा पडलेला असून गेल्या अनेक दिवसांपासून तो खड्डा तसाच आहे. या खड्ड्यात अनेक वाहनधारक पडलेले आहेत. तसेच येता जाता अनेक प्राणीही पडलेले आहेत. रात्रीच्या अंधाराच्या वेळी या रस्त्यावरून नवीन जाणाऱ्या व्यक्तीला हा खड्डा न दिसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या खड्ड्यात अपघात होऊन काही जीवितहानी होण्यापूर्वीच नगरपरिषदेने या खड्ड्याकडे  लक्ष दिले तर मोठा धोका टळून नागरिकांच्या जीवनाचे रक्षण होणार आहे. निदान नगर परिषद प्रशासनाने आता तरी या खड्ड्याच्या दुरुस्तीच्या दृष्टीने त्यांच्या सुयोग्य पद्धतीने तरी उपाययोजना करावी अशी त्रस्त नागरिकांची मागणी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार