इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट कराल तर खैर नाही !

 मंत्री पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह व्हीडीओ टाकला ;एकाविरुद्ध गुन्हा दाखल

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
    राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हीडीओ तयार करुन व्हायरल केल्याप्रकरणी सिरसाळा येथे एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
         याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, सिरसाळा येथील आरोपी  मतिन मणियार याने राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा भाषणाचा व्हिडिओ व त्यामध्ये चारही कोपर्‍यात अश्लील फोटो लावून तो व्हिडिओ 'ग्रामपंचायत सिरसाळा' या वाॅटस्अँप ग्रुपमध्ये प्रसारी केला.याप्रकरणी नसीब रहीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 138/2025 कलम- 67(A) माहीती तंत्रज्ञा अधिनीयम सह कलम 296 भान्यासं 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि उस्मान शेख पो. स्टे. सायबर बीड हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या