वीज मंडळाने आपला कारभार सुधारून ग्राहकांना चांगली सेवा द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार- डॉ. राजेश इंगोले 

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)

    सध्या अंबाजोगाई शहरात वीज विभागाच्या गलथा न कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला, व्यापारी वर्गाला तसेच वैद्यकीय आस्थापनांना विनाकारण नाहक त्रास होत आहे. वीज विभागाच्या अनियमित सेवेमुळे लाईट कधी येईल आणि कधी जाईल याचे कसलेही अंदाज कुणालाच लावता येत नाहीत. त्यामुळे अंबाजोगाई शहर येथील नागरिक ,व्यापारी वर्ग ,डॉक्टर वर्ग त्रस्त झाल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे.

    वीज विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे सोशल मीडियावर अनेकजण ही नाराजी व्यक्त करून दाखवत आहेत. परंतु मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी यामुळे सर्वजण शांत आहे मात्र याप्रकरणी अंबाजोगाईचे माजी शिक्षण सभापती डॉ राजेश इंगोले यांनी लवकरच वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना जनतेच्या वतीने जाब विचारण्यात येईल असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

         याबाबत पुढे बोलताना डॉ इंगोले यांनी अंबाजोगाई हे एक शैक्षणिक शाळा कॉलेजेस, पतसंस्था, व्यापारी  बाजारपेठ तसेच वैद्यकीय दवाखाने या आस्थापनांनी समृद्ध असलेले शहर आहे. येथे सारस्वत, गुणवंत आणि बुद्धिवंत मंडळी राहतात गेल्या सहा महिन्यापासून वीज मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होत आहे. गेल्या सहा महिन्यापासून वीज विभागाने हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पावसाळ्याकरिता मेंटेनन्स ची कामे चालू आहेत असे सांगत वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी वारंवार लाईटी घालविल्या ,वीज पुरवठा खंडित केला आणि ही कामे झाल्याचा बनाव केला होता. परंतु सध्या पावसाळा सदृश्य चित्र आहे आणि आता आकाशामध्ये साधे ढग जरी आले तरी लाईट जात आहे पाऊस आला तरी लाईट जात आहे, साधं वारं आलं तरी लाईट जात आहे , विद्युत दाब कमीजास्त होत आहेत,मग विज मंडळाने मेंटेनन्सची  कोणती कामे केली आहेत असा सवाल जनता विचारत आहे. अंबाजोगाईच्या आसपास असणाऱ्या अनेक शहरांमध्ये विद्युत पुरवठा हा सुरळीत आहे. 

        परळी बीड, बार्शी उस्मानाबाद, कळंब यासारख्या ठिकाणी लाईट नियमित असते मात्र शांत असणाऱ्या, वेळोवेळी नियमितपणे विजेचे बिल भरणाऱ्या अंबाजोगाईकरांवर वारंवार लाईटी घालून वीज मंडळ अंबाजोगाई करांच्या संयमाची परीक्षा पाहत आहे का असा सवाल डॉक्टर इंगोले यांनी केला आहे, याबाबत वीज मंडळाच्या चीफ इंजिनियर व जबाबदार अधिकाऱ्यांशी सर्वपक्षीय भेट घेऊन लवकरच याप्रकरणी विज  पुरवठा नियमित करणे बाबत वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तोडगा काढला नाही तर अंबाजोगाई करांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे डॉ. राजेश इंगोले यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार