परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
शितल अंगदराव भंडारे हिचे दहावी परीक्षेत 98% गुण घेत घवघवीत यश
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिकशालांत प्रमाणपत्र एस. एस. सी. परीक्षेत परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूलची विद्यार्थिनी कु. शितल अंगदराव भंडारे हिने 98% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
शितलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे ,शितल लहानपणापासून अभ्यासात अत्यंत हुशार असून तिने या यशाचे सर्व श्रेय तिची चिकाटी मेहनत व पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे, हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदानी ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळ महाराष्ट्र राज्य, श्रीनाथ सेवाभावी संस्था अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांच्या वतीने शितलचे अभिनंदन करत तिच्या उज्वल भविष्यासाठी रामेश्वर महाराज कोकाटे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा