प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

Congratulations!!!!

शेख बंधूंचे दहावीत घवघवीत यश !

शेख फैजान फारुख 93.60 टक्के तर शेख रेहान अब्दुलनबी 90.40 टक्के उत्तीर्ण


परळी वै, दि. 16 (प्रतिनिधी) :- अभिनव माध्यमिक विद्यालय परळी एस एस सी बोर्ड परीक्षा मार्च २०२५ मध्ये शेख फैजान फारुख 93.60 % व फौंडेशन येथे शेख रेहान अब्दुलनबी 90.40 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे. या घवघवीत  यशाबद्दल त्यांचे  नातेवाईक व आदीनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


या दोन चुलत भावाच्या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचें कौतुक होत आहे. ते लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असून त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामागे  चिकाटी, मेहनत, पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनव विद्यालय व फौंडेशन शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांनी यांचें अभिनंदन करत त्यांच्या  उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या