Congratulations!!!!
ओंकार मुंडलीक याचे दहावीत घवघवीत यश;97.60 % गुण
परळी / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूलचा विद्यार्थी चि.ओंकार संतोष मुंडलीक 97.60 % गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.चि. ओंकारच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.
प्रवीण सुहाना मसाला कंपनीचे बीड जिल्हा मार्केटिंग मॅनेजर संतोष मुंडलीक याच्या मुलगा चि.ओंकार हा लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार असून विविध स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा स्पर्धेत मध्येही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशामागे तिची चिकाटी, मेहनत, पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांनी आकांक्षाचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा