प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार
१० वी परिक्षा: अथर्वचे शतक: परळीतील या विद्यार्थ्यांने मिळवले 100 टक्के !
परळी वैजनाथ,प्रतिनिधी
नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत परळीच्या अथर्व कराड या विद्यार्थ्याने शंभर टक्के गुण मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
परळी वैजनाथ येथील विद्यावर्धिनी विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या अथर्व जीवन कराड या विद्यार्थ्याने दहावी च्या परीक्षेत शंभर टक्के गुण प्राप्त केले आहेत.अथर्व जीवन कराड याने संस्कृत व गणित या विषयात शंभर पैकी 100 गुण संपादित केले आहेत. यावर्षीच्या निकालात एकूण २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.त्यामध्ये परळीच्या अथर्व कराडने बहुमान पटकावला आहे.त्याच्या या दैदीप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.दरम्यान शाळेच्या वतीने पालकांसह त्याचा सत्कार करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा