इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

आर्य समाज मंदिर दयानंद व्यायामशाळा येथे योगदिन साजरा

 परळी -वै (प्रतीनिधी)

11वा जागतिक योग दिन आर्य समाज मंदिर दयानंद व्यायाम शाळा येथे साजरा करण्यात आला

आंतरराष्ट्रीय योग दिन हा योगासनास मान्यता देणारा दिवस आहे 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकारल्यानंतर दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. 

शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो व या दिवसाच्या माध्यमातून योगासनाचे फायदे सांगितले जातात योग दिनाच्या सुरुवात आंतरराष्ट्रीय संतुलन आणि शांती यासाठी आज दिवस प्रोत्साहन  देण्यासाठी करण्यात आज साजरा करण्यात आला. समाजात एकता शांतता आणि सौहार्दता वाढविण्यासाठी जागतिक स्तरावर योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आज जगभरात विविध स्तरावर याचा सराव म्हणजेच योगासनाचा सराव दैनंदिन जीवनामध्ये विविध वयातील लोक करत आहेत आणि याची लोकप्रियता दिवसेंदिवस बाल वया पासून प्रौढ वयापर्यंत च्या सर्व व्यक्तींमध्ये आणि सार्वत्रिक याची लोकप्रियता वाढतच जात आहे याचे सर्व आव्हान ओळखून भारताच्या पंतप्रधानांनी याची संयुक्त राष्ट्र संघाकडे मागणी केल्याच्या नंतर 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने ठराव 69/131 द्वारे 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला.

महर्षी दयानंद व्यायाम शाळेतील 21 जून रोजी सकाळी साडेसात वाजता योगा डे साजरा करण्यांत आला. यावेळी महर्षी दयानंद व्यायाम शाळेचे प्रमुख प्रा.डॉ.जगदीश कावरे यांनी योगासनाचे महत्त्व तसेच कोणते योगासन कशा पद्धतीने आणि किती अवतरणामध्ये करायचे हे समोरील योग प्रेमींना मार्गदर्शन केले यावेळी व्यायाम शाळेचे सर्व पदाधिकारी तसेच आर्य समाज चे उप प्रधान श्री लक्ष्मण हुलगुंडे सर,कोषाध्यक्ष श्री.देविदास राव कावरे सर अंतर्गत सदस्य श्री. गोवर्धन चाटे व्यायामशाळेचे  शिक्षक सहशिक्षक व विद्यार्थी पालक वृध उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन महर्षी दयानंद व्यायाम मल्लखांब पटू श्री अजय राऊत यांनी केले. तसेच समोर बसलेल्या योग प्रेमींना योगासना चे प्रात्यक्षिक करून दाखवले ते दयानंद व्यायाम शाळेचे विद्यार्थी श्री समर्थ धोंकटे, यावेळी कार्यक्रमाचे आभार आर्य समाज उप प्रधान श्री.लक्ष्मण राव हुलगुंडे सर यांनी मानले तर व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!