अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक परंपरेने समृद्ध असलेले एकमेव शहर होय-राजकिशोर(पापा) मोदी
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-
श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अंबाजोगाई येथील मोदी लर्निंग सेंटरमध्ये दिनांक 18 जून रोजी झालेल्या नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या अंबाजोगाई शहर व परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
अंबाजोगाई हे शैक्षणिक परंपरेने समृद्ध असलेले शहर असून, येथून नेहमीच मेहनती, हुशार आणि प्रेरणादायी विद्यार्थी घडले आहेत. या यशामध्ये शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत दिसून येते.
न्यू व्हिजन पब्लिक स्कूलमधील इयत्ता दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने केवळ आपल्या संस्थेपुरते मर्यादित न राहता इतर शाळांमधील विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
हीच खऱ्या अर्थाने शैक्षणिक बांधिलकी आणि सामाजिक जाणीव दर्शवणारी गोष्ट आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाचा गौरव करताना आम्हांला अतिशय आनंद झाला आसल्याचे मा. नगराध्यक्षा राजकिशोर पापा मोदी यांनी म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा