वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी
अंबाजोगाई(प्रतिनिधी):-
बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले यांस काल अंबाजोगाई पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने मुंबई येथील जेल मधून ताब्यात घेऊन येथे आणल्या नंतर आज दि ४ रोजी न्यायलयात हजर केले असताना अंबाजोगाई येथील न्यायालयाने कासले यास 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या महाराष्ट्राच्या वर्तुळात चर्चेत असलेले नाव म्हणजे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले. रणजित कासले याला दिल्लीतून पोलिसांनी अटक केली होती. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे, आंबजोगाई शहर पोलीस स्टेशन आणि सायबर विभागात त्याच्याविरोधात रविवारी आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच मुंबईतही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोप प्रकरणात रणजीत कासलेला अटक करण्यात आली. दरम्यान, पोलीस त्याला कोर्टाबाहेर घेऊन जाताना कासलेने सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
बीड पोलीस दलात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन खंडणी मागितल्या प्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले होते. तर, निवडणुकीत ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी आपल्या खात्यावर धनंजय मुंडे यांच्या माणसाकडून 10 लाख रुपये टाकल्याचा दावाही त्याने केला होता. काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नेत्यांवर गंभीर आरोप करत विविध दावे केले, ज्यामुळे एकच खळबळ माजली होती. याच सर्व प्रकरणांमुळे राज्यातील विविध भागांमध्ये कासले याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. त्याच्या विरोधात बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन अघाव यांच्या तक्रारीवरुन सामाजिक शांतता भंग केल्या प्रकरणी, तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे गुन्हा नोंद आहे.
अन्य गुन्हात राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्याबद्दल बदनामीकारक भाष्य सोशल मिडीयातून केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी ही तक्रार दिली असून या दोन्ही बाबीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे. रणजित कासलेच्या विरोधात यापूर्वी बीड, परळी, अंबाजोगाई यासह मुंबईतही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काही दिवसापूर्वीच रणजित कासलेला जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर कासलेने पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आरोप केले होते.
बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला रविवारी पोलिसांनी दिल्ली येथे अटक केल्या नंतर सोमवारी मुंबईतील किल्ला कोर्टात हजार करण्यात आले न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असताना अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला रंजीत कासले याचे विरुद्ध दाखल गु र न 214/ 2025 कलम 316 (2), 318 (4) बी एन एस या कलमा नुसार दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत व अंबाजोगाईचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार पोलीस कॉन्स्टेबल चादर पोलीस कॉन्स्टेबल भागवत नागरगोजे वाहन चालक ए एस आय शिंदे या पथकाने न्यायालयाच्या परवानगीने काल दुपारी कासले यांना मुंबई येथून ताब्यात घेऊन आंबेजोगाई येथे आणून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्या. अश्विनी ढवळे यांच्या कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने कसले यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे यावेळी सरकार पक्षातर्फे ऍड गिरी तर आरोपी पक्षातर्फे ऍड. नवनाथ साखरे यांनी काम पाहिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा