जिल्हाधिकाऱ्यांच्या "जनता दरबार" उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद — 280 अर्ज निकाली, 234 प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही सुरू

बीड : बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आठवड्यातून तीन दिवस जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे. प्रत्येक सोमवार, मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 ते 2 या वेळेत हा दरबार भरतो असून, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त तक्रारींवर तातडीने कार्यवाही केली जाते.


सदर उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत एकूण 534 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 280 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित 234 प्रकरणांवर कार्यवाही सुरू असून, संबंधित विभागांना त्वरीत निकाल लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अर्जांची माहिती व कार्यवाहीची स्थिती नोंदवण्यासाठी गुगल शीटद्वारे संकलन करण्यात येत आहे.


_तालुकास्तरावरील समस्यांमुळे जिल्हा कार्यालयात गर्दी_


जनता दरबारात प्राप्त होणाऱ्या तक्रारी प्रामुख्याने तालुकास्तरावरील असल्याचे निदर्शनास आले आहे. उपविभागीय व तहसील कार्यालयांकडून तक्रारींचे निराकरण न झाल्यामुळे नागरिक जिल्हा कार्यालयात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.


_नवीन परिपत्रक जारी — आता तालुका आणि उपविभागीय स्तरावरही जनता दरबार_


ही परिस्थिती लक्षात घेता, दिनांक 28 मे 2025 पासून प्रत्येक सोमवार आणि गुरुवार दुपारी 12 ते 2 या वेळेत उपविभागीय व तालुकास्तरावरही जनता दरबाराचे आयोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. त्यामुळे आता नागरिकांना त्यांच्या स्थानिक पातळीवरच त्यांच्या तक्रारी सादर करता येणार असून, तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी यावर कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आलेल्या आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार