ढिसाळ कारभार: वाहतूक चालू की बंद :प्रशासनाने केला संभ्रम तयार!
आवमेळ: उड्डाणपुलावरील वाहतूक: रात्री १२.३० वा बॅरिकेटिंग लावून वाहतूक बंद केली रात्री १.३० वा.बॅरिकेटिंग काढून सुरु केली!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती चे काम करण्यासाठी आज मध्यरात्रीपासून उड्डाणपूलावरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांनी अधिकृतपणे सांगितले असुन प्रशासकीय नियोजन पुर्ण झालेले आहे त्यामुळे ५जुलैपर्यत वाहतूक बंद ठेवून तातडीने उड्डाणपूल दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या अनुषंगाने मध्यरात्री १२ वाजल्यानंतर वाहतूक बंद करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात बॅरिकेटिंग, सुचना फलक आदी करण्यात आले.मात्र रात्री १.३० वा. ज्यांनी लावले त्बॅयांनीच बॅरिकेटिंग काढले! असा प्रकार घडला.यामुळे प्रशासकीय ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोो आला.तसेच वाहतूक चालू की बंद? असा प्रशासनाने मोठा संभ्रम तयार केला.
गेल्या वीस वर्षांत एकदाही डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल दुरावस्थेकडे बघण्यात आले नाही ही वस्तुस्थिती आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून उड्डाणपूलाचे बसस्टॅडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डाव्या बाजुचे कठडे पुर्णत: कोसळून गेले मोठा धोका निर्माण झाला तरीही याच्या दुरुस्तीला मुहूर्त लागला नाही. उड्डाणपूलावरील रस्त्यांवर खड्डे, पादचारी मार्गाची वाताहत याकडे वीस वर्षांत कोणी बघितले नाही. सध्याच्या काळात पावसाळ्याचे दिवस, आषाढी वारी,शहरात दाखल होणाऱ् मा्र दिंड्या आदी काही कारणांसाठी ही वाहतूक आत्ता बंद ठेवू नये अशी जनभावना आहे.
मात्र याचा कोणताही विचार न करता ,याबाबत जनमत तयार न करता,कोणतीही गांभीर्यपूर्वक जनजागृती न करता थेट एखादं पत्र काढून मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला जातो हेच सर्वांना खटकणारे आहे.त्याचबरोबर एवढा महत्त्वाचा विषय हाताळण्यात संबंधित यंत्रणा फोल ठरल्याचे दिसते. या कामावर ना कोणी जबाबदार अधिकारी उपस्थित राहतो ना याबाबतची अधिकृत माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी उपलब्ध असतो अशी ढिसाळ अवस्था दिसुन येत आहे. याचेच उदाहरण वाहतूक बंद करण्यात व पुन्हा धरसोड करुन ती सुरु करण्यातून दिसुन येते.एकंदरीत या विषयाला गांभीर्यपूर्वक घेतले नसल्याचे दिसून येत असुन कोणाचाच कोणाला मेळ नाही हे स्पष्ट होते.
उड्डाणपूल दुरुस्तीही अत्यंत गरजेची पण...
दरम्यान परळीत येण्याचे मुख्य प्रवेशद्वार हा डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल आहे.हा पुल मुख्य मार्गिका असुन यावरुनच मोठ्या संख्येने सर्व प्रकारची वाहने जातात.त्यामुळे नियोजित वेळेनुसार दुरुस्तीची कामे त्या त्या वेळी होणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.काही दिवसांसाठी वाहतूक मार्ग बदलल्याने नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागणार असला तरी उड्डाणपूल भविष्यात निर्धोक राहणे हेही महत्त्वाचेच आहे.उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामानंतर कात टाकणार असुन सर्वांच्या हितासाठी आणि कोणताही धोका उत्पन्न होवू नये यासाठी ही कामे होणेही गरजेचे आहे. मात्र हे करीत असतांना जनभावनेचा विचार करणे, योग्य मध्यमार्ग काढून जनतेशी संबंधित विषय लक्षात घेत हाताळणी करणे गरजेचे आहे. वाहतूक बंद ठेवू नका अशी जनभावना नाही तर काहीकाळ वाहतूक बंद करु नका अशी मागणी होत आहे त्यादृष्टीनेच हा विषय हाताळणे आवश्यक आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा