वैद्यनाथाच्या गाभाऱ्यात विसरलेली बॅग केली परत – प्रामाणिकपणाचा उत्तम प्रत्यय
परळी वैजनाथ – वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या सुनिता जाधव आणि अनिता जाधव या भाविकांची हॅन्डबॅग मंदिराच्या गाभाऱ्यात विसरली होती. बॅगमध्ये रोख पाच हजार रुपये व सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन होता.
गाभाऱ्यात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचारी बबली वाघमारे यांनी ही बॅग आढळल्यावर तात्काळ ती मंदिरातील पोलीस चौकीत जमा केली. पोलीस चौकीचे इंचार्ज स.पो.उपनि. राजाराम शेळके यांनी तत्परतेने शोध घेऊन संबंधित भाविकांशी संपर्क साधला व त्यांना बॅग परत केली.
या प्रामाणिक व तत्पर कृतीमुळे भाविकांनी पोलीस विभागाचे आभार मानले असून, बबली वाघमारे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
ही घटना भाविकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करणारी असून, प्रामाणिकतेचा उत्तम आदर्श ठरली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा