आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घेत भामट्यांनी केली फसवणूक
अंबाजोगाईतील सेवानिवृत्त शिक्षिकेला ‘डिजिटल अरेस्ट’ करून सायबर भामट्यांनी लुटले तब्बल ८३ लाख रुपये
अंबाजोगाई : मी महाराष्ट्र पोलिस बोलत असून तुमच्या नावाने मनी लॉन्ड्रींग आणि अतिरेक्यांना फंडींग झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आम्हाला सहकार्य करा असे म्हणत व्हाट्सअपला व्हिडीओ कॉल करून निवृत्त शिक्षिकेला डीजिटल अरेस्ट केली. त्यानंतर २१ ते २९ मे या दरम्यान तब्बल ८३ लाख रूपये ऑनलाईन हडप केले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींनी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल द्वारे मुंबई पोलिसांचे ऑफिस, झेंडे, लोगो दाखवून खोटे वातावरण निर्माण केले. “डिजिटल अरेस्ट”मध्ये असल्याचे सांगून, भीती दाखवत शिक्षिकेकडून आर्थिक व्यवहार करवून घेतले. हे सर्व खरे असे समजून या सेवानिवृत्त शिक्षिका यांनी २१ मे रोजी पहिल्यांदा एकाचवेळी ३५ लाख १० हजार रूपये ऑनलाईन पाठविले. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी त्यांनी २९ मे पर्यंत ८३ लाख १ हजार ८१६ रूपये सायबर भामट्यांना पाठविले.
सोने, प्लॉट गहान ठेवून घेतले कर्ज
सायबर भामट्यांनी या सेवानिवृत्त शिक्षिकेला भिती दाखवत तुमच्याकडे कोणती संपत्ती आहे, हे आम्हाला येथे दिसते. तुम्ही लपवुन ठेवु नका, असे सांगितले. त्यानंतर सावित्री यांनी सोने, प्लॉट गहान ठेवुन त्यावर कर्ज घेतले आणि २९ मे रोजी हे सर्व पैसे भामट्यांना ऑनलाईन पाठविले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा