श्रीगुरु शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांचे वैद्यनाथ दर्शन व बेलवाडी मंदिरास भेट
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –श्री१०८ गुरू शंकरलिंग शिवाचार्य महाराज, मठ संस्थान खरोळा (ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) यांनी मंगळवारी परळी वैजनाथ येथे सदिच्छा भेट दिली. द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे त्यांनी दर्शन घेतले.
दर्शनानंतर श्रीगुरु महाराजांनी बेलवाडी येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मंदिर संस्थान येथे भेट दिली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष श्री दत्तात्रयआप्पा ईटके गुरुजी यांनी महाराजांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले व त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. यावेळी महाराजांनी संत गुरलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे झालेल्या नवीन बांधकामाचे पाहणी करून समाधान व्यक्त केले
या प्रसंगी समाजातील मान्यवर माजी नगराध्यक्ष सोमनाथआप्पा हालगे, महादेव ईटके, दयानंद स्वामी, विकास हालगे, श्याम बुद्रे, रमेश चौंडे, संजय खाकरे, नितीन समशेटी, सुशील हरंगुळे, प्रकाश खोत, शिवकुमार चौंडे, दत्तात्रय गोपनपाळे, दीपक स्वामी, फुलारी आप्पा, गणेश स्वामी, व योगेश स्वामी यांचा समावेश होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा