समृद्धी महामार्गावर समृद्ध करणारी जनभावना...!

"मुंडे साहेबांमुळेच प्रगती झाली"... समृद्धी महामार्गावर हळवा क्षण; पंकजाताईंना आला भावनिक अनुभव!

परळी वैजनाथ| प्रतिनिधी

       वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी आयुष्यभर झगडणारे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती आजही जनमानसात किती खोलवर रुजलेल्या आहेत, याचा छोटासा पण अतिशय भावनिक करणारा अनुभव नुकताच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी घेतला.


       समृद्धी महामार्गावर प्रवास करत असताना, बाजुच्या लेनमधून धावणाऱ्या दुसर्‍या एका गाडीतून अचानक एका महिलेनं हातात कागद घेत तो पंकजाताईंना दाखवण्याचा प्रयत्न केला. त्या कागदावर लिहिलं होतं – "आम्ही मुंडे साहेबांमुळेच इंजिनिअर झालो... प्रगती झाली. Thank you!"


हा प्रसंग पाहून क्षणभर पंकजाताईंनाही भावनिक आठवणींनी ओथंबून टाकलं. “मेसेज मुंडे साहेबांसाठी होता. समृद्धी मार्गाच्या वेगासही तो क्षणभर थांबवून गेला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


पंकजाताईंनी या हृदयस्पर्शी प्रसंगाचा व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर पोस्ट करत तो अनुभव शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे अनेकांना गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची आठवण झाली आणि अनेकांनी कमेंट्समधून आपल्या भावना व्यक्त केल्या.


गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर ग्रामीण, मागास, वंचित आणि शोषित घटकांच्या न्यायासाठी कार्य केलं. त्यांच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची, तरुणांना रोजगाराची आणि गरजूंना मदतीची संधी मिळाली. त्यामुळेच आजही अनेक कुटुंबं त्यांना “देव” मानतात.


हा अनुभव केवळ भावनिक नसून, गोपीनाथराव मुंडे यांच्या कार्याचा जनमानसात किती दीर्घकालीन आणि खोलवर प्रभाव आहे, याचं जिवंत उदाहरण ठरला आहे.नेते आपल्यातून जातात, पण त्यांचं काम आणि त्यांची लोकांच्या ह्रदयामधील जागा कायम राहते. मुंडे साहेबांनी ही जागा आपल्या कार्यातून निर्माण केलेली आहे, हेच या प्रसंगातून पुन्हा एकदा सिद्ध झालं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार