हार्दिक अभिनंदन!!!!
संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर रौप्यमहोत्सवी पुण्यस्मरण सोहळा: बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना "माऊली सेवा समर्पण पुरस्कार" जाहीर
परळी वैजनाथ, जि. बीड (प्रतिनिधी) – अखिल भारतीय वारकरी मंडळ यांच्या वतीने २१ व्या शतकातील महान संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या रौप्यमहोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना "माऊलीसेवा समर्पण पुरस्कार" जाहीर करण्यात आला आहे.
सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे दीर्घकालीन योगदान, निस्वार्थी सेवा आणि समर्पण वृत्ती याची दखल घेत अ.भा. वारकरी मंडळाने यावर्षीच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली असल्याचे अ.भा. वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांनी सांगितले आहे.श्री. धर्माधिकारी यांचे कार्य समाजासाठी एक दीपस्तंभ ठरलेले आहे. त्यांनी दाखवलेला सेवाभाव आणि सातत्यपूर्ण प्रयत्न प्रेरणादायी आहेत.हा पुरस्कार संत सेवा, समाजकार्य आणि भक्तिपंथातील सेवा,समर्पण व योगदानासाठी दिला जात असुन, यंदा पुरस्काराचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने त्याचे महत्त्व अधिकच आहे. पुरस्कार वितरणाचा सोहळा लवकरच परळी येथे होणार असून, मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये संतविचार, वारकरी संप्रदाय, आणि समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या व्यक्तीमत्वाचा गौरव होणार आहे.
श्री. बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असुन, विविध संस्था, संघटना आणि नागरिकांकडून त्यांना अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा