प्रेरणादायक उपक्रम....!
देशासाठी, देशासोबत – परळी तालुका माहेश्वरी सभेचा देशहितासाठी आदर्श उपक्रम
परळी (प्रतिनिधी) –
महेश नवमीच्या पावन दिनानिमित्त परळी तालुका माहेश्वरी सभेने समाजसेवेचा आणि देशसेवेचा आदर्श ठरवणारा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’ या देशहिताच्या कार्यात योगदान देण्यासाठी ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून सभेने निधी संकलन मोहीम राबवली. या अंतर्गत परळीमधील माहेश्वरी कुटुंबांनी एकत्र येत रु. १५,००० (पंधरा हजार) इतका निधी संकलित केला.
संकलित निधी थेट नॅशनल डिफेन्स फंड (NDF) कडे सुपूर्त करण्यात आला असून, या माध्यमातून देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या सैनिकांना मदतीचा हात दिला गेला आहे. यामुळे परळी तालुका माहेश्वरी सभा सामाजिक कार्यासोबत देशभक्तीचा आदर्शही निर्माण करत आहे.
या उपक्रमात सभेचे पदाधिकारी, सदस्य आणि त्यांच्या परिवाराचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. समाजासाठी, देशासाठी काहीतरी देण्याची भावना प्रत्येक सदस्याच्या कृतीतून दिसून आली.
परळी तालुका माहेश्वरी सभेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, इतर सामाजिक संस्था आणि संघटनांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा