एसपींच्या उपस्थितीत उद्या जनसंवाद बैठक - अंबाजोगाई उपविभागात नागरिकांसोबत संवाद साधण्याचा उपक्रम
अंबाजोगाई (प्रतिनिधी) - अंबाजोगाई उपविभागात नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी एक विशेष जनसंवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक बुधवार दिनांक १८ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह, अंबाजोगाई येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमास नवनीत काँवत (भा.पो.से), पोलीस अधिक्षक, बीड हे प्रमुख उपस्थित राहणार असून, श्रीमती चेतना तिडके (म.पो.से), अप्पर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई यांची देखील विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या बैठकीचे आयोजन उपविभाग अंबाजोगाईतील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून आपले प्रश्न, अडचणी व सूचना थेट पोलिस अधिकाऱ्यांपुढे मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा