पंकजा मुंडे यांच्या रामटेक शासकीय निवासस्थानी खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट
मुंबई।प्रतिनिधी....
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मुंबईतील रामटेक या शासकीय निवासस्थानी छत्रपती शिवाजीमहाराज यांचे वंशज खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रथमच सदिच्छा भेट दिली. या औपचारिक भेटीचे स्वरूप अत्यंत मनमोकळे आणि आत्मीयतेचे ठरले.
यावेळी पंकजाताई मुंडे यांनी महाराजांचे हृदयपूर्वक स्वागत केले. भेटीदरम्यान, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आणि उदयनराजे भोसले यांच्यातील जुने राजकीय व कौटुंबिक संबंध, आठवणींमधून उजळत गेले. या चर्चेतून दोन्ही कुटुंबांमधील स्नेहबंध पुन्हा दृढ झाल्याचे जाणवले.या प्रसंगी आ. सीमाताई हिरे तसेच इतर शिष्टमंडळही उपस्थित होते. या भेटीमुळे केवळ औपचारिकतेपेक्षा एक विशिष्ट आत्मीयता आणि भावनिक संवादाचा क्षण उपस्थित झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा