राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन पुण्यात; उपस्थित रहा- ॲड.जीवनराव देशमुख

   परळी वैजनाथ — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन मंगळवार, दि. १० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह, संभाजी पार्क जवळ, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण  खा. श्री. शरदचंद्र पवार उपस्थित राहणार आहेत.


या महत्त्वाच्या कार्यक्रमात पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच पुढील काळासाठी पक्षाच्या कार्ययोजनेवर चर्चा होणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.


        परळी वैजनाथ शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख यांनी या निमित्ताने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाचा उत्साहवर्धक वर्धापन दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन हा पक्षासाठी तसेच जनतेसाठी नव्या आशा व उमेदिंनी भरलेला दिवस आहे. या कार्यक्रमात आपण एकत्र येऊन पक्षाच्या प्रगतीचा आढावा घेणार आहोत आणि भविष्यासाठी नवीन मार्ग आखणार आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याने आणि समर्थकाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या पक्षाला बळकटी देणे गरजेचे आहे.” त्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा वर्धापन दिन कार्यक्रम पक्षाच्या एकतेचा आणि नव्या संकल्पांचा संदेश देणारा कार्यक्रम ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार