ना.पंकजा मुंडेंनी दिलं सर्वांना निमंत्रण
गोपीनाथगडावरील आजचा कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा
ना.पंकजा मुंडेंनी दिलं सर्वांना निमंत्रण
परळी वैजनाथ,।दिनांक ०२।
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पुण्यतिथी दिन म्हणजेच तीन जून हा गोपीनाथ मुंडे परिवाराचा पारिवारिक कार्यक्रमासून हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे.कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले असुन सर्वांनी उपस्थित राहावे असे निमंत्रण ना. पंकजा मुंडे यांनी दिले आहे.
याबाबत ना. पंकजा मुंडे यांनी एका व्हिडिओद्वारे सर्व मुंडे प्रेमींना आवाहन केले आहे. 3 जून हा दिवस उजडूच नये असे आपल्या सर्वांनाच वाटते. मात्र गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारावर मार्गक्रमण करून प्रेरणा व ऊर्जा घेण्यासाठी तीन जूनला आपण सर्वजण मोठ्या संख्येने गोपीनाथ गडावर येत असता. त्या दृष्टिकोनातून यावर्षीही तीन जून रोजी पारंपरिक पद्धतीने हा पुण्यतिथी दिन साजरा केला जाणार आहे. रामायणाचार्य ह.भ.प रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन व महाप्रसाद असा हा गोपीनाथ मुंडे परिवाराचा पारिवारिक कार्यक्रम आहे.तरी सर्वांनी तीन जून रोजी सकाळी 11 वाजता गोपीनाथ गडावर उपस्थित राहावे असे आवाहन राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा