पोलीसांची धडक कारवाई!
सिरसाळा परिसरात लाखोंचा गुटखा जप्त;एक गजाआड
परळी / प्रतिनिधी....
परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत मौजे हिवरा शिवारात हिवरा गावात जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी पाटीजवळ राज्यात प्रतिबंधित असलेला लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी एक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहीतीनुसार सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत हिवरा शिवारात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटका चारचाकी गाडीतून वाहतूक होणार आल्याच्या खबरीवरून ग्रामीण पोलिसांना गुरुवार दि 19 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास कारवाई करत लाखोंचा गुटखा जप्त केला ज्यामध्ये 3 लाख रुपयांचा गुटखा आणि एक चारचाकी वाहन पोलिसानी जप्त करत एकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी ठाण्याचे कर्मचारी योगेश समुद्रे यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 170/2025 कलम 123,223,274,275,3 (5) भा. न्या. संहिता अनव्ये1) बळीराम रामचंद्र नवले वय 31 वर्षे रा. फुलारवाडी ता. पाथरी जि. परभणी 2) शकील अन्सारी रा. पाथरी 3) गफार मगदुम शेख 4) अजीज उर्फ अजीम हैदर कुरेशी दोन्ही रा. परळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई सिरसाळा पोलिस उपनिरीक्षक दहीफळे, पोलीस कर्मचारी रामचंद्र केकाण , गोविंद भताणे यांच्या पथकाने केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा