परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 परळी वैजनाथ नगर परिषदेचा नेहमीप्रमाणेच अंध:कारमय कारभार !

गजानन महाराज पालखी सोहळा अंधारातच मार्गस्थ, भक्तगणांमध्ये संतापाचा सूर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –

       संत गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत जगमित्रनागा मंदिर ते आझाद चौक या मार्गावर आज (२१ जून) पहाटे ५ वाजता पालखी मार्गस्थ झाली. मात्र, यावेळी संपूर्ण पालखी मार्गावरील पथदिवे बंद होते. परिणामी, पालखी अंधारात मार्गस्थ होण्याची नामुष्की पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ओढवली.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने भाविकांनी पहाटे लवकर उठून पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. मात्र, शहरातील मुख्य पालखी मार्गावरील पथदिवे बंद असल्याने संपूर्ण मार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. परिणामी, पालखी अंधारात पुढे जावी लागली. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला असून नगर परिषदेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि सोहळ्याच्या शिस्तबद्धतेसाठी प्रकाशव्यवस्था अत्यंत आवश्यक असते. तरीदेखील प्रशासनाने याबाबत कोणतीही पूर्वतयारी न करता निष्काळजीपणाच दर्शविला आहे. शहरात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना स्थानिक प्रशासनाची मदत मिळावी हीच अपेक्षा असते, मात्र परळी नगर परिषद वारंवार अशीच उदासीनता दाखवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक नागरिक तसेच भाविकांनी नगर परिषदेच्या या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त करत जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकारामुळे प्रशासनाचा नियोजनशून्य आणि असंवेदनशील कारभार पुन्हा एकदा उजेडात आला आहे.

पालखी अंधारातच मार्गस्थ?

  • संत जगमित्रनागा मंदिर ते आझाद चौक दरम्यान सर्व पथदिवे बंद
  • पालखी मार्गावर पथदिवे चालू नव्हते
  • भाविक भक्तांमध्ये चीड 
  • नगर परिषदेच्या नियोजनाचा अभाव




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!