परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

माजी आमदार पृथ्वीराज साठे यांची निवेदनाद्वारे मागणी

महाडिबीटी प्रणाली सुरू करून लाभधारकांची हेळसांड थांबवा ; जनगनना करताना दारिद्र्य रेषेत पात्र असणाऱ्या कुटूंबांचा समावेश करा



माजी आमदार पृथ्वीराज साठे यांची निवेदनाद्वारे मागणी

अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-

महाडिबीटी प्रणाली सुरू करू लाभधारकांची हेळसांड थांबवा ; जनगनना करताना दारिद्र्य रेषेत पात्र असणाऱ्या कुटूंबांचा समावेश करा अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उपजिल्हाधिकारी यांना शुक्रवार, दिनांक २० जुन २०२५ रोजी दोन स्वतंत्र निवेदने देण्यात आली.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाडिबीटी प्रणाली बंद असल्यामुळे श्रावणबाळ, संजय गांधी, निराधार योजना, विधवा महिलांना दिले जाणारे अनुदान व दिव्यांग यासाठी मिळणारे अनुदान हे महाडिबीटीमुळे मिळत नाही. कारण, गेल्या एक महिन्यापासून महाडिबीटी बंद आहे. त्यामुळे या सर्व लाभधारकांची मोठी हेळसांड होत आहे. त्यासाठी त्यांना बँकेचे व आपल्या कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. त्यामुळे तात्काळ महाडिबीटी सुरू करून उपेक्षितांना न्याय देण्यात यावा. ज्या लाभधारकाचे अनुदान सात ते आठ महिन्यांपूर्वी मंजुर झालेले आहे. अशा अनुदानास पात्र लोकांना फक्त एक महिन्याचे अनुदान मिळालेले आहे. उर्वरित सात ते आठ महिन्यांच्या संदर्भातील अनुदान तात्काळ देण्यात यावे तसेच केंद्र सरकारने जनगनना करण्याबाबतची अधिसूचना काढलेली आहे.

         त्या अनुषंगाने आमची मागणी आहे की, सन २००५-०६ रोजी दारिद्र्य रेषेच्या सर्व्हे करण्यात आला होता. त्या नंतर सन २०११ च्या जनगनने मध्ये जे कुटूंब दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना दारिद्र्य रेषेखालील कुटूंबासाठी ज्या सेवा सुविधा व योजनाचा लाभ देण्याबाबत सुचना होत्या परंतु केंद्र सरकारच्या रचनेप्रमाणे या वेळेस जनगनना होणार आहे. त्या वेळेस सर्व्हे करीत असतांना दारिद्र्य रेषेस पात्र असणाऱ्या कुटूंबाचा समावेश जनगनना मध्ये करावा. अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनांतून करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ.नरेंद्र काळे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पदवीधर संघटना.), अशोक मोदी, संजिवनी देशमुख, अंकुश ढोबळे, तानबा लांडगे, ऍड.शहाजहान खान पठाण, ऍड.प्रशांत पवार, हमीद चौधरी, सुधाकर जोगदंड, इम्रान यारखान,विशाल जहागीरदार, दिलीप भालेकर, ऍड.नरेश साबणे, ऍड.इस्माईल गवळी, ऍड.एस.के. पठाण, चंद्रकला देशमुख, आशा जोगदंड, धनराज सोनवणे, शेख अकबर अली,खतीब ताई,रामराव आडे,राजकुमार वाहूळे,वैजनाथ राठोड,गफार गवळी,आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी बहुसंख्यने  उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!