शिवमहापुराण कथेला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिन्याची चोरी
केज :- चाकरवाडी येथे आयोजीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथा श्रवण करण्यासाठी जात असलेल्या एका ५५ वर्षिय महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांची केज येथील बस स्टँड वरून चोरी झाली आहे.
धारूर येथील गंगाबाई सुग्रीव मुंडे वय (५५ वर्षे) या दि. ८ जून रोजी सकाळी १०:३० वा. चे सुमारास उषाबाई व सुनिता गायकवाड यांच्या सोबत शिवपुराण कथा ऐकण्यासाठी चाकरवाडी येथे जाण्या करीता केज येथील बसस्थानका मधून दुपारी १२:३० वा. चे सुमारास चाकरवाडीकडे जाणाऱ्या एस टी बसमध्ये चढत असतांना त्यांच्या गळ्यातील ७३ हजार ५०० रु. किंमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्यांनी चोरले.
या प्रकरणी दि. ११ जून रोजी गंगाबाई मुंडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ३०३/२०२५, भा. न्या. सं. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने हे तपास करीत आहेत.
■ _ परळीत सुनेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ;गुन्हा दाखल_
■ _शिवमहापुराण कथेसाठी चाकरवाडीला गेलेला बत्तीस वर्षीय इसम बेपत्ता_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा