रस्त्यावर जड वाहनांची पार्किंग: शालेय विद्यार्थ्यांना अडथळा- मजास इनामदार यांचं निवेदन 


परळी : शहरातील श्री संत जगमित्र नागा मंदिर जवळील लिटल फ्लॉवर स्कूल व नवगण कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्यावर  जड वाहनांची पार्किंग करण्यात येत आहे त्यामुळे रहदारीस अडथळा होत असून शालेय विद्यार्थ्यांना त्रासदायक होत आहे. याप्रकरणी बसवेश्वर कॉलनी जवळील  सरदार नगर येथील मजास इनामदार यांनी  मंगळवारी शहर पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन सादर केले आहे.

          रस्त्यावरील जड वाहनांची पार्किंग हटवावी अशी मागणी इनामदार यांनी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे तसेच या भागातील रस्त्यावर गतिरोधक करण्याची मागणी परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या सदर्भात मजाज इनामदार यांनी सांगितले की, इमदादुलउलूम शाळा, लिटल फ्लॉवर स्कूल कडे शहरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शाळेच्या रस्त्यावर ट्रक लावण्यात येत असल्याने  विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरत आहे तसेच नवगण कॉलेजकडे व नवगण कॉलेज कडून येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही अडचणीचे होत आहे. सकाळी व संध्याकाळी वॉकिंग ला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे याप्रकरणी प्रशासनाने लक्ष घालून जड वाहनांचे पार्किंग हटवावे अशी मागणी मज्जाज इनामदार यांनी केली आहे. याप्रकरणी आपण माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची माहिती मजास इनामदार यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !