देवाच्याच दारात 'वाकडंतिकडं' करण्याचा संतापजनक प्रकार!
शिवभक्तांच्या भावना दुखावणाऱ्या व बोगस कामे करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा-शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे
परळी (प्रतिनिधी): श्री क्षेत्र परळी वैजनाथ तीर्थ क्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत वैद्यनाथ मंदिर पूर्व द्वारास दर्शन सभा मंडपामध्ये कंत्राटदाराकडून मांसाहार शिजवत असल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. सदर घटने मुळे तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्याने जनमानसात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. समाज विघातक कृत्य करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कार्यवाही करा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे.
तीर्थ क्षेत्र विकास आराखडा अंतर्गत महाराष्ट्र शासनाने पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिर च्या विकास कामासाठी शेकडो कोटींचा निधी दिला आहे. पण कंत्राटदाराकडून बोगस कामे करून विकास कामांचा निधी घशात घालण्याचा प्रकार सर्रास पने सुरू आहे. करोडोंचा भ्रष्टाचार करून ही भूक भागत नसल्याने बोगस कामे करणाऱ्या कंत्राटदाराने आता थेट मंदिर परिसरात मांसाहार शिजवून तमाम शिवभक्तांच्या भावनाशी खेळ मांडला आहे. मंदिर चे पावित्र्य भंग करणाऱ्या कंत्राटदारावर प्रशासनाने कठोर कार्यवाही करून त्याचा परवाना रद्द करावा व तीर्थ क्षेत्र विकास आराखड्याचे काम योग्य कंत्राटदारास देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी केली आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख वैजनाथ माने, युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष चौधरी, सुदर्शन यादव, संजय गावडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा