असे आहे पंकजाताई मुंडे यांचे ट्विट...
दरवळतो अजुनही इथे तुमच्या स्मृतीचा सुगंध...!
पंकजा मुंडेंनी आपले पिता आणि नेत्याच्या काव्यपंक्तीतून जागवल्या स्मृती
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा आज ३ जुन रोजी ११ वा.स्मृतीदिन.त्यानिमित्ताने लाखो जनसमुदाया कडून या लोकोत्तर लोकनेत्यांच्या स्मृती जागवल्या जात आहेत.याच अनुषंगाने गोपीनाथराव मुंडे यांचा समर्थ वारसा चालवणाऱ्या पंकजाताई मुंडेंनी अतिशय समग्र अर्थपुर्ण काव्य पंक्तीतूनआपले पिता आणि नेत्याच्या स्मृती जागवल्या आहेत.
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी कवितेच्या चार ओळी ट्विट करत आपले पिता व नेता गोपीनाथराव मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवन चरित्रातील समग्र सार ध्वनित करणाऱ्या या अतिशय अर्थपुर्ण चार काव्यपंक्ती आहेत.
असे आहे पंकजाताई मुंडे यांचे ट्विट...
----------------------
दरवळतो अजुनही इथे तुमच्या स्मृतीचा सुगंध...
बरसतो अजूनही स्नेह, अमर्त्य अशा नात्याचा हा बंध...
वंदनीय लोकनेते स्व.गोपीनाथराव जी मुंडे साहेब यांना ११ व्या स्मृतीदिनी विन्रम अभिवादन!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा