जिजाभाऊंचे अकाली निधन ही कधीही न भरून निघणारी हानी, धनंजय मुंडे भावूक
स्व. आर. टी. देशमुख यांच्या कुटुंबीयांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन
जिजाभाऊंचे अकाली निधन ही कधीही न भरून निघणारी हानी, धनंजय मुंडे भावूक
परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज माजी आमदार तथा भाजपचे नेते स्वर्गीय आर. टी. जिजा देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या स्मृतिस आदरांजली अर्पण करत देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले.
स्व. आर. टी. देशमुख यांचे एका कार अपघातात लातूर जिल्ह्यातून परतत असताना दुर्दैवी निधन झाले होते. मात्र त्यावेळी धनंजय मुंडे हे विपश्यना केंद्रात असल्याने अंत्यविधिस उपस्थित नव्हते.
धनंजय मुंडे यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली तेव्हा ते चांगलेच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आर. टी. देशमुख हे स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब तसेच स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या सोबत अगदी तळागाळात काम केलेले एक सच्चे सहकारी म्हणून सुपरिचित होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना मुंडेसह देशमुख कुटुंबीय सुध्दा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
जीजांचे अकाली निधन ही देशमुख कुटुंबाइतकीच मुंडे कुटुंबाची सुद्धा हानी असून आता तिहाने कधीही भरून निघणार नाही अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी आरटीजीसांचे ज्येष्ठ बंधू एच. टी. देशमुख एम.टी देशमुख, जे. टी. देशमुख, पुत्र रोहित देशमुख, राहुल देशमुख, अभिजित देशमुख यांसह देशमुख कुटुंबीय तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, माणिकभाऊ फड, रामेश्वर मुंडे यांसह आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा