युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

आ.बच्चू कडू यांच्या उपोषणाला किसान सभेचा पाठींबा

कर्जमाफी करिता किसान सभेचे तीव्र निदर्शने

आ.बच्चू कडू यांच्या उपोषणाला किसान सभेचा पाठींबा


माजलगाव : प्रतिनिधी

    अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असताना बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला असून या खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात हाल केले असून खरिपाची पेरणी कशी करावी या विदारक मानसिकतेत बोगस व महागडी खते, बी-बियाणे याचा खर्च कसा करावा या चिंतेने शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करत तातडीने बळीराजाला मदत करावी यासाठी बीड जिल्हा किसान सभेने गुरुवार (दि 12 ) रोजी माजलगाव उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आ.बच्चु कडू याच्या उपोषणाला पाठींबा देत सरकारचा निषेध केला.

सरकारी धोरणांमुळे शेतकरी कायम अडचणीत आलेला असून तो कर्जबाजारी झालेला आहे. या कर्जाच्या विळख्यातून त्याला बाहेर काढण्याचे आश्वासन राज्य सरकार मध्ये बसलेल्या सत्ताधारी पक्षांनी विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. मात्र निवडून येताच 'आम्ही असे बोललोच नाही', 'बोललो असलो तरी आम्ही मुदत दिलेली नाही' अशी सारवासारव सुरू केली आहे. बीड जिल्हा किसान सभेने वेळोवेळी कर्जमाफी, पिकविमा, हमीभाव, गायरानजमीन, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासंबंधी प्रश्न लावून धरला. खरिपाच्या तोंडावर अवकाळी पावसाने केलेले नुकसान, सत्ताधारी मंडळींचे बळीराजा प्रति असलेली आस्था या सर्वच चीड आणणाऱ्या बाबीबर प्रहार संघटनेचे शबच्चू कडू यांनी या व इतर काही मुद्याला घेऊन उपोषण सुरु केले आहे. त्या उपोषणास अखिल भारतीय किसान सभेचा पूर्ण पाठिंबा आहे.राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्षांनी निवडणूक वेळी दिलेले आपलं वचन पाळून बच्चू कडू यांना उपोषणापासून परावृत्त करावे. असे झाले नाही बीड जिल्हा किसान सभा या प्रश्नांना घेवून आपल्या  पूर्ण ताकतीनिशी मोठे आंदोलन छडेल असा इशारा यावेळी किसान सभेने दिला. 

या निदर्शने प्रसंगी किसान सभेचे कॉ.एड.अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. दत्ता डाके,कॉ.कृष्णा सोळंके, कॉ.सुदाम शिंदे, कॉ. सुदामदादा देशमुख, कॉ. सुहास झोडगे, कॉ.शिवाजी कुरे, कॉ.सुभाष डाके, कॉ.अशोक डाके, कॉ.अशोक राठोड, कॉ.बंडू गरड, कॉ.चंद्रकांत घाटे, कॉ.फारुख शेख आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या