पंकजा मुंडे ,आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईत आज पर्यावरण परिषद  

 

मुंबई (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, दिनांक ५ जून रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील बांद्रा येथील ताज लँड्स एंड हॉटेलमधील बॉलरूममध्ये भव्य पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे आयोजन भाजप नेत्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, मुंबईचे पालकमंत्री  आशिष शेलार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


या पर्यावरण परिषदेत पर्यावरण विषयक अभ्यासपूर्ण चर्चा, तज्ज्ञांशी संवाद आणि पर्यावरण रक्षणासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन होणार आहे. फक्त विचारांपुरते मर्यादित न राहता, कृतीद्वारे पर्यावरण जपण्याची गरज अधोरेखित करत पंकजाताई मुंडे यांनी या कार्यक्रमाद्वारे जनजागृतीची नवी दिशा देण्याचा संकल्प केला आहे.


"आता केवळ विचार नव्हे, कृतीने जनजागृती करायची वेळ आली आहे," असे स्पष्ट करत पंकजाताई मुंडे यांनी नागरिकांना आणि पर्यावरणप्रेमींना आवाहन केले की, त्यांनी या परिषदेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहावे आणि पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.

       या परिषदेमुळे पर्यावरण विषयक नव्या संकल्पनांना चालना मिळणार असून, भविष्यातील पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण दिशादर्शन होण्याची अपेक्षा आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !