🟠 अधिवेशनात 'हटके ग्रॅण्ड एण्ट्री' : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचा ईव्ही कारमधून 'ग्रीन प्रवास'!

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनीच ई -व्हेईकल वापरासाठी  पुढाकार घ्यावा- पंकजा मुंडे

 

मुंबई, ३० जून (प्रतिनिधी) –

           राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज एक वेगळाच आदर्श घालून दिला. प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरास सुरुवात केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, त्यांनी पारंपरिक वाहनाऐवजी महिंद्राच्या ईव्ही कारमधून रामटेक निवासस्थानातून थेट विधिमंडळात 'ग्रीन एण्ट्री' केली.

         महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज एक नवा आणि प्रेरणादायी आदर्श प्रस्थापित केला. प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत इलेक्ट्रिक कारच्या वापराची सुरुवात केली आहे. "आधी केले मग सांगितले" या उक्तीला अनुसरून त्यांनी जनतेसमोर कृतीतून संदेश दिला की, शासकीय पातळीवर प्रदूषणविरहित पर्यायांची निवड ही काळाची गरज आहे.विधिमंडळात पंकजाताई मुंडेंची "ईव्ही ग्रॅण्ड एण्ट्री" ही अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली. पारंपरिक वाहनांऐवजी हरित पर्यायांचा अवलंब करण्याची दिशा सरकारने स्वीकारल्याचे हे प्रतीक ठरत आहे.

पंकजाताईंनी स्वत:च्या  कृतीतून दिला संदेश

----------------------

          अधिवेशनाला रवाना होण्यापूर्वी त्यांनी ईव्ही कारचं विधीवत पूजन केलं आणि महिंद्राच्या अधिकाऱ्याकडून कारची चावी स्वीकारली."प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनीच EV वापर करावा," असा स्पष्ट संदेश त्यांनी या कृतीतून दिला आहे. आज पंकजाताईंची ही ग्रॅण्ड एण्ट्री विधिमंडळाच्या दारातच चर्चेचा विषय ठरली! पत्रकारांच्या नजरा, कॅमेरे आणि उपस्थितांचं लक्ष सगळंच या एका वेगळ्या हटके स्टाईलकडे वळलं होतं.


प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यावा- पंकजा मुंडे

-----------------------

         प्रदूषणमुक्त महाराष्ट्र ही फक्त घोषणा राहता कामा नये, तो कृतीतून दिसला पाहिजे. म्हणूनच मी आजपासून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू केला आहे. अधिवेशनासाठीही आज EV कारनेच प्रवास केला.

आपण सगळ्यांनी मिळून पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेतला, तरच भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा, स्वच्छ निसर्ग आपण जपू शकतो. यासाठी सर्वांनी EV सारख्या पर्यायांचा अवलंब करणे गरजेचे आहे. मी सुरुवात केली आहे —आता तुमची पाळी आहे. EV वापराला सुरूवात करून प्रदूषणविरोधी मोहिमेला बळ द्या असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी बोलतांना केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !