आश्वासनाची पूर्ती ; ना.पंकजा मुंडेंनी मानले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार

बर्दापूर ते लोखंडी सावरगांव रस्त्याचे चौपदरीकरण होणार ; भरीव निधीची तरतूद 

मुंबई।दिनांक २१।

परळी मतदारसंघातील बर्दापूर ते लोखंडी सावरगांव रस्ता रुंदीकरणाला आता गती येणार असून यासाठी भरीव निधीची तरतूद आराखड्यात करण्यात आली आहे, या कामासाठी जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजा मुंडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.


   विधानसभा निवडणुकीच्या वेळेस प्रचार करताना ना. पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेत  बर्दापुर ते लोखंडी सावरगाव रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी केली होती, हा रस्ता अरूंद असल्याने यावर वारंवार अपघात झाले होते, त्यामुळे ही मागणी पुढे आली होती, यावर गडकरी यांनी रस्त्यासाठी लवकरच निधी देऊन काम सुरू करू असे आश्वासन दिलं होते. याच मागणीसाठी ना.पंकजाताईंनी गडकरी यांची दिल्ली येथे भेटही घेतली होती.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांच्या २०२५-२६ च्या वार्षिक आराखड्यात बर्दापूर ते लोखंडी सावरगांव या एकूण १८ किमी लांबीच्या चौपदरीकरणाचा समावेश अधिकृतपणे करण्यात आला असून या कामासाठी २५० कोटींचा खर्च अपेक्षित असून तेवढ्या निधीची तरतूद करण्यात या आराखड्यात करण्यात आली आहे. दरम्यान, जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याबद्दल ना. पंकजाताईंनी गडकरींचे आभार मानले आहेत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार