श्री संत सावतामाळी प्रवेश कमान ते श्री गणेशपार गणेश मंदिर रोडवर नवीन कोनिकल पोल (पथदिवे) बसवा-बाळू फुले
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
परळीतील मुख्य रस्ता श्री संत सावतामाळी प्रवेश कमान ते श्री गणेशपार गणेश मंदिर रोडवर नवीन कोनिकल पोल (पथदिवे) बसवा अशी मागणी एका निवेदनाद्वारे बाळू फुले यांनी केली आहे.
नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,श्री संत सावतामाळी प्रवेश कमान ते श्री गणेशपार गणेश मंदिर रोड वर नवीन कोनिकल पोल (पथदिवे ) प्लॅन मध्ये मुख्य रस्ता असताना सुद्धा श्री संत सावतामाळी प्रवेश कमान पर्यंतच कोनिकल पोल बसवण्यात आले आहेत तरी मुख्याधिकारी यांनी यात लक्ष घालून संबधितांना लवकरात लवकर सूचना देत गणेशपार भाग न वगळता श्री संत सावतामाळी प्रवेश कमान ते श्री गणेशपार गणेश मंदिर रोड वर नवीन कोनिकल पोल बसवून द्यावेत. अन्यथा समस्त गणेशपार भागातील नागरिकांना सोबत घेत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा