ना.पंकजा मुंडेंना उमाताई समशेट्टे परिवाराची अनोखी भेट



लोकनेत्याच्या स्मृतिदिनी दिली गोमाता ; गोपीनाथ गड करणार गोमातेचा सांभाळ


परळी वैजनाथ। दिनांक ०३।

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा अकरावा स्मृतिदिन आज विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. या निमित्ताने गोपीनाथ गडावर अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगानेच आज गोपीनाथ गडावर गोमातेची अनोखी भेट भाजपा शहराध्यक्षा उमाताई समशेट्टी यांनी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना दिली. या गोमातेचा सांभाळ करण्याची जबाबदारी गोपीनाथ गडाने घेतली आहे. 

      दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याशी प्रत्येक कार्यकर्ता व व्यक्तीपरत्वे भावना जोडलेल्या आहेत. गोपीनाथ गड हे समर्थक व मुंडे प्रेमींसाठी एक देवालयच बनलेले आहे. गोपीनाथ गडावर तीन शक्तीपिठांचे एकत्र मंदिरही आहे. याठिकाणी गोमाता असावी या भावनेपोटी समशेट्टी परिवाराने  यांनी एक गोंडस गोमाता (कालवड)  गोपीनाथगडाला भेट देण्याचा निर्णय घेतला. उमाताई समशेट्टी यांनी ही गोमाता ना.पंकजाताई मुंडे यांना सुपूर्द केली. यावेळी नितीन समशेट्टी, आश्विन मोगरकर, प्रितेश तोतला, अनिश अग्रवाल, राहूल घोबाळे आदी उपस्थित होते. आता या गोमातेचा गोपीनाथ गडावर सांभाळ केला जाणार आहे. गोपीनाथ गडाच्या पालक व राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री  पंकजाताई मुंडे या अर्थाने गोमाता भेट ही  अनोखी भेट ठरली आहे.

••••








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !