नांदुरवेस परिसरातील गटार व रस्त्याची कामे तातडीने पुर्ण व्हावीत – मा.नगरसेवक अनिल अष्टेकर
परळी वैजनाथ – प्रभाग क्र. 15 चे मा. नगरसेवक अनिल अष्टेकर यांच्या मागणीनुसार नांदुरवेस परिसरातील रस्ते, गटार व सरस्वती नदी स्वच्छतेच्या कामाची नगरपरिषद मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी पाहणी केली.
पावसाळ्यात साचणाऱ्या घाण पाण्याच्या समस्येवर चर्चा झाली. रस्ते व गटार खोदून उंची वाढवण्याची मागणी करण्यात आली.मुख्याधिकारी कांबळे यांनी स्वच्छता निरीक्षकांना तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले.नगरसेवक अष्टेकर यांनी कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे मा. नगरसेवक रमेश चौंडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
नांदुरवेस भागातील लादण्या व रस्त्याची उंची कमी असल्याने पावसाळ्यात घाण पाणी साचते. ही समस्या दूर करण्यासाठी रस्ता व गटार किमान दोन फूट खोदून काम करावे, अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.यावेळी नगरपरिषदचे विक्रम स्वामी, शिवसेनेचे सचिन स्वामी, युवा नेते चंद्रप्रकाश हालगे व लहु हालगे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा