सुरक्षारक्षक व पोलीसांच्या तत्परतेमुळे मोबाईल परत मिळाला

वैद्यनाथ मंदिरात देवदर्शनास आलेल्या भाविकाचा मोबाईल एकाने चोरला पण लगेचच....

सुरक्षारक्षक व पोलीसांच्या तत्परतेमुळे मोबाईल परत मिळाला

परळी वैजनाथ – प्रतिनिधी...

     वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर पोलीस चौकीचे इंचार्ज स.पो.उपनि.राजाराम शेळके व सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे तो पुन्हा त्यांना परत मिळाला. ही घटना मंदिर परिसरात घडली.

        हडपसर, पुणे येथील संतोष साहेबराव गठाळ (वय ४९) हे रविवार १५ जून रोजी वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर गाभाऱ्यातून बाहेर पडताना त्यांच्या मागील खिशातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल कोणीतरी चोरून नेला. याची तक्रार त्यांनी तात्काळ मंदिरातील पोलीस चौकीत दिली.त्यानंतर पोलीस चौकीचे इंचार्ज स.पो.उपनि.राजाराम शेळके आणि मंदिराचे सुरक्षा सेवेकरी यांनी तात्काळ  तपास सुरू केला. अन्नछत्र व मंदिराच्या पायऱ्यांजवळ तपास घेत असताना तेलंगणा राज्यातील सुधाकर नामक व्यक्तीकडे हरवलेला मोबाईल सापडला. त्याला चौकीत आणण्यात आले. पुढील चौकशीनंतर हरवलेला मोबाईल संतोष साहेबराव गठाळ यांना परत देण्यात आला.ही कामगिरी मंदिर पोलीस चौकीचे इंचार्ज स.पो.उपनि.राजाराम शेळके, सुरक्षा सेवेकरी सुनिता गायकवाड, प्रियंका सरवदे आणि गंगाराम डोने यांनी यशस्वीपणे पार पाडली.

या तत्परतेमुळे एक भाविक आपली मौल्यवान वस्तू गमावण्यापासून वाचला असून, भाविकांकडून मंदिरच्या सुरक्षा यंत्रणेचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !