परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

सहभागी व्हावे -दिपक देशमुख यांचं आवाहन

 सप्तश्रृंगी देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याची जय्यत तयारी

हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणार भक्तिभावनेचा सोहळा

परळी / प्रतिनिधी 

     परळीतील गणेशपार परिसर श्रद्धेच्या भावनांनी भारलेला असून, श्री सप्तश्रुंगी सेवाभावी संस्था, परळी वैजनाथ यांच्या वतीने आई सप्तश्रुंगी देवीच्या सुती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण  वातावरणात संपन्न होणार आहे.


या पवित्र सोहळ्यास आषाढ शुद्ध नवमी, शुक्रवार दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता भव्य मिरवणुकीस प्रारंभ होणार असून दुपारी ०१.११ वाजता शुभमुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. यानंतर भाविकांसाठी दुपारी २ ते ४ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


शोभेची मिरवणूक व गोंधळ मिरास श्री सप्तश्रुंगी सभागृह, गणेशपार येथून निघणारी मिरवणूक ही गणेशपार – नांदुरवेस – अंबेवेस – श्री वैद्यनाथ मंदिर – नेहरू चौक – मोंढा – रोडे चौक – टॉवर – गणेशपार मार्गे परत अशी असणार आहे. रात्री जागरण गोंधळ, अग्निकुंडातून चालणे आणि सप्तश्रृंगी देवीचा लगेच कार्यक्रम पार पडणार आहे.


या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे मा. कृषिमंत्री  महाराष्ट्र राज्य आ.धनंजय मुंडे व  सौ. राजश्रीताई मुंडे यांच्या शुभहस्ते देवीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार असून, परळीकरांसाठी ही एक धार्मिक व गौरवाची घटना ठरणार आहे.


यावेळी वणीचे भगत प्रकाश गुरु राऊत, निफाडचे राहुल आराधी तसेच परळीचे धनराज सुरवसे, धोंडाबाई बोने, गायत्री गुरु आणि परसराम होळंबे यांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार, विधी व पूजन पार पडणार आहे.


या भक्तिभावपूर्ण सोहळ्याचे आयोजन दिपक (नाना) देशमुख मा.नगराध्यक्ष,न.प.परळी वैजनाथ व संस्थापक अध्यक्ष,श्री सप्तश्रुंगी सेवाभावी संस्था, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!