उबाठा शिवसेनेचा परळीत उपक्रम!
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त रमेश चौंडे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
परळी(प्रतिनिधी)
हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी नगरसेवक रमेश चौंडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
मराठी माणसांचे प्रश्न हाती घेत स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा गुरुवार दि.१९ जुन रोजी ५९ वर्धापन दिन साजरा केला जातो.माजी नगरसेवक रमेश चौंडे यांनी गावभागातील सर्वात जुन्या असलेल्या नुतन केंद्रीय प्राथमिक शाळा व ज्ञानबोधीनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी धनंजय आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी बोलताना रमेश चौंडे यांनी शिवसेनेची स्थापना,ध्येय धोरणे याविषयी माहिती सांगुन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणापेक्षा समाजकारणावर आम्ही भर देत आलो आहोत. या कार्यक्रमास नुतन केंद्रीय शाळेतील शाळेतील शिक्षक मुज्जमील सर,सुवर्णकार मॅडम,ज्ञानबोधीनी विद्यालयाचे शिक्षक धुमाळ सर,क्षीरसागर सर,आलापुरे सर,केंद्रे सर,आंधळे सर व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा