इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची कामे मार्गी लावण्यात धनंजय मुंडे ४ तास रमले

 धनंजय मुंडेंच्या राष्ट्रवादी भवन भेटीस तुफान गर्दी

पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची कामे मार्गी लावण्यात धनंजय मुंडे ४ तास रमले

बीड (दि. १३) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री आ  धनंजय मुंडे आता पुन्हा एकदा कामकाजात कमालीचे सक्रिय झाले असून आज त्यांनी बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे जनता संवाद उपक्रमास उपस्थित राहून पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व कामे समजून घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भवनचा संपूर्ण परिसर कार्यकर्ते व नागरिकांनी तुडुंब भरून गेला होता. 


पक्षातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर आलेल्या नागरिकांची कामे मार्गी लावण्यामध्ये धनंजय मुंडे हे तब्बल चार तास रमले होते. 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर  चव्हाण, माजी आमदार संजय  दौंड, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, समता परिषदेचे ॲड सुभाष राऊत, डॉ योगेश क्षीरसागर, बबन गवते, अमर नाईकवाडे, फारुख पटेल, मोईन मास्टर, अविनाश नाईकवाडे यांसह विविध आघाडी, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी उपस्थित होते.


■ _धनंजय मुंडे यांनी घेतली जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट_ > परळी मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या विषयांवर प्रदीर्घ चर्चा


■ _ परळीत सुनेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ;गुन्हा दाखल_


■ _शिवमहापुराण कथेसाठी चाकरवाडीला गेलेला बत्तीस वर्षीय इसम बेपत्ता_


■ _शिवमहापुराण कथेला चाकरवाडीला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिन्याची चोरी_














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!