राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन :मोठ्या संख्येने उपस्थित रहा- सय्यद फेरोज
परळी वैजनाथ — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन पुणे येथे होणार आहे.वर्धापन दिन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परळी वैजनाथ रा.काॅ.शरदचंद्र पवार पक्ष युवक शहराध्यक्ष सय्यद फेरोज यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २६ वा वर्धापन दिन मंगळवार, दि. १० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह, संभाजी पार्क जवळ, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्र पवार मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.या महत्त्वाच्या कार्यक्रमात पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच पुढील काळासाठी पक्षाच्या कार्ययोजनेवर चर्चा होणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या निमित्ताने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाचा उत्साहवर्धक वर्धापन दिन साजरा करण्याचे आवाहन परळी वैजनाथ रा.काॅ.युवक शहराध्यक्ष सय्यद फेरोज यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा