आरोग्याची वारी पंढरी दारी- आरोग्य विभागाचा सुत्य उपक्रम

संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी आगमन निमित्ताने उपक्रम

परळी / प्रतिनिधी

आषाढी वारी ही महाराष्ट्राची एक महान आणि पवित्र परंपरा आहे, ज्यात लाखो वारकरी पंढरपूरकडे पायी चालत जातात. या लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दरवर्षी राज्य सरकार, आरोग्य विभाग आणि विविध स्वयंसेवी संस्था महत्त्वाच्या आरोग्य सेवा पुरवत असतात.आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' उपक्रम: राज्य सरकारने 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा विशेष उपक्रम सुरू केला आहे, ज्या अंतर्गत परळी तालुका आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांना उत्तम आरोग्य सेवा आणि आरोग्य तपासणी आदी सुविधा पुरवल्या जात आहेत।


 संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या परळी वैद्यनाथ या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत आरोग्य विभागाचे हजारो कर्मचारी, डॉक्टर्स आणि स्वयंसेवक सर्वच पालखी सेवेकरी यांच्यासाठी अतोनात प्रयत्नशील असतात.  शासकीय रुग्णालयातील कर्मचारी हे देखील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करतात आणि आवश्यक उपचार देतात ज्यामध्ये महिला वारकऱ्यांसाठी, विशेषतः गरोदर माता आणि लहान मुलांसाठी, "हिरकणी कक्ष" उभारले जातात. येथे स्त्रीरोगतज्ज्ञ आणि इतर आवश्यक सेवा उपलब्ध असतात.दिंडी प्रमुखांना औषधांचे कीट उपलब्ध करून दिले जातात, जेणेकरून सामान्य आजारांवर तात्पुरते उपचार करता येतील.पालखी मार्गावरील पाणी स्रोतांचे सर्वेक्षण आणि निर्जंतुकीकरण केले जाते, तसेच हॉटेल आणि धाब्यांवरील कामगारांची आरोग्य तपासणी केली जाते. यामुळे साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यास मदत होते.


या सर्व आरोग्य विषयक जनजागृती आणि मदतकार्यकरीता आरोग्य ची वारी पंढरीचा दारी,अंतर्गत गुरुवार दि 19 रोजी परळी तालुक्यात श्री गजानन महाराज यांची पायी दिंडी पालखी चें आगमन झाले. त्यावेळी आरोग्य विभाग मार्फत सर्व संत वारकरी यांचे आरोग्य विषयक विचारणा व प्राथमिक उपचार केले. तसेच आरोग्य विषयक जनजागृती कारणासाठी चें फलक लावण्यात आले.याप्रसंगी डॉ. लोमटे , मोरे,डॉ. पिंगळे सर,डॉ.घुगे सर,व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी आरोग्य विषयक जनजागृती करत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार