परळी वैजनाथ: (वैद्यनाथ) ओंकार साखर कारखान्यात चोरी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
येथील पांगरी च्या ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड (जुने नाव- वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना) मध्ये चोरीची घटना घडली असुन याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, ओंकार साखर कारखाना प्रा. लि. पांगरी येथील मिल मधील साफसफाईसाठी मिल नं ४ जवळ काढुन ठेवलेले पितळी लाईनर कोणीतरी दोन अज्ञात चोरट्यांनी एक मिल जी.एम. बेरिंग लाईनर पितळेचे वजन अंदाजे ७० किलो किंमत ६०००० रु.चोरून नेले आहे. या प्रकरणी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी बालाजी दत्तराव मुंडे यांनी फिर्याद दिली असुन त्यानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.२जुन रोजी दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोह तोटेवाड हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा