रातोरात चौकाचे निर्माण आणि नामफलकाचे अनावरण

मोठी बातमी: परळीत रात्रीतून उभा राहिला 'स्वा.वि.दा. सावरकर चौक'

परळी वैजनाथ — शहरात 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चौक' नावाने नव्याने एक चौक साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा चौक अधिकृतपणे नगर परिषद किंवा स्थानिक प्रशासनाने निर्माण केलेला नाही, तर सावरकरप्रेमींनी स्वतः पुढाकार घेऊन रातोरात हा चौक उभारला आहे.

अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण

परळी शहरात सावरकरप्रेमींची अनेक वर्षांपासून मागणी होती की, शहरातील एखाद्या प्रमुख चौकाला स्वा. वि. दा. सावरकर यांचे नाव द्यावे. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून या मागणीची दखल घेतली गेली नव्हती. त्यामुळे सावरकरप्रेमींमध्ये नाराजी होती. अखेर त्यांनी स्वतः पुढाकार घेत, शहरातील नाथरोडवरील महत्त्वाच्या रस्त्यावर हा चौक तयार केला.

रातोरात चौकाचे निर्माण आणि नामफलकाचे अनावरण

सावरकरप्रेमींनी शहरातील नाथरोड या एका प्रमुख रस्त्यावर  चौक तयार केला. विशेष म्हणजे, या चौकात रात्रीतूनच नामफलकाचे अनावरणही करण्यात आले. भगवे झेंडे आणि पुष्पहाराने सजवलेला हा महत्त्वपूर्ण चौक आता शहरात निर्माण झाला आहे.

व्हिडिओ झाला व्हायरल

चौक नामकरण आणि नामफलकाच्या अनावरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. सावरकर प्रेमींच्या स्वयंस्फूर्तीने उभारलेला हा चौक शहरात सावरकरांचे विचार आणि स्मरण कायम ठेवण्याच्या दृष्टीने हा एक आगळा-वेगळा पाऊल ठरला आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !