चाकरवाडी येथून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात –पाच जण जखमी : भाविक परळी तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती
चाकरवाडी | प्रतिनिधी
चाकरवाडी येथून देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन काही जण जखमी झाल्याची घटना आज (१२ जून) रात्री घडली. या अपघातात दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलासह एकूण पाच जण जखमी झाले असुन, सध्या त्यांच्यावर नेकनुर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुदैवाने यात कोणताही जीवितहानी झाली नाही, मात्र जखमींना किरकोळ ते गंभीर दुखापती झाल्या आहेत. सर्व प्रवासी परळी तालुक्यातील असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. जखमींना तात्काळ नेकनूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा