मित्रासोबत चाकरवाडीला गेलेला बत्तीस वर्षीय इसम बेपत्ता

केज :- कृषी केंद्रावर काम करीत असलेला ३२ वर्षीय इसम त्याच्या मित्राच्या सोबत चाकरवाडीला गेला होता. तो परत घरी आला नाही. म्हणून त्याच्या पत्नीने तिचा नवरा हरवला असल्याची तक्रार दाखल केली आहे.


या बाबतची माहिती अशी की, नांदुरघाट ता. केज येथे राहत असलेले विलास मदन पाटोळे वय (३२ वर्ष) हे नांदूर फाटा येथील शिवप्रसाद कृषी सेवा केंद्रावर काम करतात. दि. १२ जून रोजी विलास पाटोळे हे कृषी सेवा केंद्रावरून काम करून सायंकाळी घरी आले आणि जेवण करून त्यांच्या पत्नीकडे फायन्सचे कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे दिले. त्यानंतर मित्रा सोबत चाकरवाडी येथे सुरू असलेल्या ज्ञानेश्वर माऊली यांच्या २५ व्या पुण्यस्मरणा निमित्त आयोजित प्रदीप शर्मा यांच्या शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाला जात आहे असे सांगून गेले. त्या नंतर रात्री ते आले नाहीत. त्यांचा फोन बंद आहे.त्यामुळे त्याची पत्नी सौ. ज्याती विलास पाटोळे हिने केज पोलीस ठाण्यात तिचा नवरा हरवल्याची तक्रार दिली आहे.या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.

■ _ परळीत सुनेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ;गुन्हा दाखल_

चोरी_














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार