परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

अष्टांग योगाच्या आचरणाने जगात शाश्वत सुख व शांतता नांदते ! 

"वैद्यनाथ" मधील योगदिनी डॉ. नयनकुमार आचार्य यांचे विचार

    परळी वैजनाथ- (दि.२१) 

सद्य परिस्थितीत वाढत्या शारीरिक, मानसिक विकारांना दूर करण्यासाठी "योग" हा मौलिक उपाय असून अष्टांग योगाच्या आचरणाने जगात शाश्वत सुख व शांतता नांदू शकते, असे प्रतिपादन योग अभ्यासक डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले. 

          येथील वैद्यनाथ महाविद्यालयात काल (२१) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित योगासन, प्राणायाम व ध्यान शिबिरात ते प्रमुख प्रशिक्षक म्हणून बोलत होते. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन प्र. प्राचार्य डॉ .जे.व्ही. जगतकर यांनी केले.

              या शिबिरात श्री आचार्य यांनी उपस्थितांना सूर्यनमस्कार, सर्वांगसुंदर व्यायाम, विविध आसने , भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी हे प्राणायाम व ध्यानमुद्रा आदींचे प्रशिक्षण दिले. तसेच योगाच्या यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या आठ अंगांचे महत्त्व प्रतिपादन केले. यावर्षीच्या "एक पृथ्वी - एक आरोग्यासाठी योग" या संकल्पनेनुसार समग्र भूतळावरील प्रत्येक देशात निवास करणाऱ्या प्रत्येक मानवासाठी "योग" हा खुला असून योगाच्या आचरणाने सर्व प्रकारचे चिंता,नैराश्य, दुःख, वैरभावना लयास जातात. म्हणूनच विश्वकल्याणासाठी अष्टांग योग हे शाश्वत सुखाचे मुख्य द्वार आहे, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. 

            यावेळी या शिबिरात उपप्राचार्य प्रा. डी. के. आंधळे, डॉ. व्ही.बी. गायकवाड, प्रा. हरीश मुंडे, प्रा.डा. पी. एल. कराड, प्रा.डा. माधव रोडे, कॅप्टन प्रा. जी.एस. चव्हाण, साई अकॅडमीचे संचालक प्रा.रमेश  पवार यांच्यासह जवळपास अडीचशे विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व सूत्रसंचालन  उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले, तर आभार प्रा.जी.एस.चव्हाण यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!